For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कटाच्या अंतर्गत केजरीवालांना अटक

06:35 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
कटाच्या अंतर्गत केजरीवालांना अटक
Advertisement

आप नेते संजय सिंह यांचा दावा : काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबले

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तुरुंगातून जामिनावर बाहेर पडलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शुकवारी पत्रकार परिषद घेतली आहे. यादरम्यान त्यांनी अरविंद केजरीवाल यांना कटांतर्गत अटक करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. काम करणाऱ्या एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात डांबण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या अबकारी धोरण घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना जामीन मंजूर केला होता. संजय सिंह यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शविला नव्हता.

Advertisement

कटाच्या अंतर्गत केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अबकारी धोरण घोटाळ्यात भाजपचे अनेक मोठे नेते सामील आहेत. घोटाळ्यातील आरोपींवर दबाव टाकून केजरीवाल विरोधात जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. मंगूटा परिवाराने दबावानंतर स्वत:चे वक्तव्य बदलले आहे. यानंतरच संबंधिताला जामीन मिळाला असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे.

मंगुटा रे•ाr यांनी एकूण 3 तर त्यांच्या पुत्राने 7 जबाब नोंदविले आहेत. 16 सप्टेंबर रोजी त्यांना अरविंद केजरीवाल यांना ओळखता का असे विचारण्यात आले असता त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर मंगुटा रे•ाr यांच्या पुत्राला 5 महिन्यांसाठी तुरुंगात पाठविले जाते. 10 फेब्रुवारीपासून 17 जुलैदरम्यान 7 वा जबाब नोंदविला जातो आणि त्यात बदल केला जातो. आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जबाब देतो. पितापुत्राच्या 9 वक्तव्यांमध्ये केजरीवालांच्या विरोधात काहीच बोलले गेले नव्हते. नंतर यंत्रणांनी दबाव टाकून वक्तव्य करवून घेण्यात आल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे.

केजरीवाल-सिसोदिया तुरुंगात

संजय सिंह हे जामिनावर तुरुंगातून बाहेर पडले असले तरीही मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अद्याप तुरुंगात आहेत. संजय सिंह यांनी तपास यंत्रणेच्या कारवाईवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आप नेत्यांना जाणुनबुजून तुरुगांत डांबण्यात आले असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.