For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजय देवरकोंडासोबत जमणार कीर्ति सुरेशची जोडी

07:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
विजय देवरकोंडासोबत जमणार कीर्ति सुरेशची जोडी
Advertisement

राउडी जनार्धना चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर

Advertisement

किंगडम चित्रपटानंतर विजय देवरकोंडा हा ‘राउडी जनार्धना’ या चित्रपटात दिसून येणार आहे. एका घायाळ इसमाच्या जीवनाची यात कहाणी असणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकासोबत याची खास झलक शेअर करण्यात आली असून ती पाहून चाहते अत्यंत उत्सुक झाले आहेत.  निर्मात्यांनी राउडी जनार्धना चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होईल. या चित्रपटाची निर्मिती प्रख्यात निर्माते दिल राजू करत आहेत. हा पॅन-इंडिया चित्रपट असून यात विजय देवरकेंडासोबत कीर्ति सुरेश मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. क्रिस्टो जेवियरने या चित्रपटाला संगीत दिले आहे. कीर्ति सुरेश ही दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विजय अन् कीर्तिची जोडी मोठ्या पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे. विजयने 2011 साली ‘नुव्विला’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. परंतु त्याला खरी ओळख 2015 चा चित्रपट ‘येवेदे सुब्रमण्यम’मधील सहाय्यक भूमिकेमुळे मिळाली. तर 2016 साली ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पेली चोपुलु’मुळे त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. यानंतर अर्जुन रे•ाr, गीता गोविंदम आणि डियर कॉमरेड यासारख्या यशस्वी चित्रपटांसह तो तेलगू चित्रपटातील आघाडीचा कलाकार ठरला.

Advertisement
Advertisement
Tags :

.