For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकुमारसोबत काम करणार कीर्ति सुरेश

07:00 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजकुमारसोबत काम करणार कीर्ति सुरेश
Advertisement

राजकुमार राव याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘रफ्तार’ असून यात त्याच्यासोबत दिग्गज दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर करणार आहे. तर याची निर्मिती राजकुमारची पत्नी पत्रलेखा स्वत:च्या कम्पा फिल्म या बॅनर अंतर्गत करणार आहे.  या चित्रपटाची कहाणी वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअपच्या जगतावर आधारित आहे. यात एका अशा युवक आणि युवतीची कहाणी आहे, जे यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. पैसा, शक्ती आणि प्रलोभने वाढण्यासोबत त्यांच्या नात्याचीही परीक्षा सुरू होत असल्याचे कहाणी दाखविणार आहे.  चित्रपटात भारताच्या शिक्षणव्यवस्थेवरही मतप्रदर्शन केले जाणार आहे, ज्यात अनेकदा ज्ञानापेक्षा नफ्याला महत्त्व दिले जात असल्याचे दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात राजकुमार आणि कीर्तिसोबत तान्या माणिकतला, रजत कपूर, अनुराग ठाकूर आणि रोहन वर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.