किर्ती सुरेश अडकली लग्न बंधनात
साऊथची अभिनेत्री किर्ती सुरेश हीचा विवाह नुकताच अॅंटोनी थाटील सोबत झाला. गोव्यामध्ये एका खासगी समारंभात हा विवाह सोहळा पार पडला. या आनंदाच्या क्षणाचे फोटो किर्तीने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडेलवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केले.
किर्तीने तिचा दिर्घकाळाचा बॉयफ्रेण्ड अॅंटोनी थाटीलसोबत लग्न केले. दोघेही १५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अॅंटोनी हा दुबई बेस्ड बिझनेसमन आहे. त्यांच्या व्यवसायांची चेन केरळ, तामिळनाडूमध्ये पसरलेली आहे. किर्तीने अॅंटोनीसोबतचे नाते नेहमी गुपित ठेवले. २७ नोव्हेंबर रोजी तिने इन्स्टाग्रामवरून नात्याची १५ वर्ष पूर्ण असे सांगत हे रिलेशनशीप अनाऊंन्स केले.
किर्तीने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. तिने आजवर मल्याळी, तामिळ, तेलगु भाषेत सिनेमे केले आहेत. किर्तीचे वडिल हे चित्रपट निर्माते आहेत, तर किर्तीची आई ही अभिनेत्री आहे. किर्तीने सरकार, रेमो, रिंगमास्टर, थाना सेर्धा कूटम अशा अनेक हिट सिनेमात काम केले आहे. तिला महनती या सिनेमातील सावित्री या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.