For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2 तास मोबाइल बंद ठेवल्यावर मेंदू होणार सक्रीय

06:01 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
2 तास मोबाइल बंद ठेवल्यावर मेंदू होणार सक्रीय
Advertisement

वाढणार स्मरणशक्ती, टेन्शन होणार कमी

Advertisement

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आमचा मेंदू सदैव फोन, टीव्ही, कॉम्प्युटर आणि आसपासच्या गोंगाटाने व्यापलेला असतो. परंतु वैज्ञानिकांनी आता अत्यंत सरल आणि मोफत पद्धत शोधून काढली आहे, जी मेंदूला नवे जीवन देऊ शकते. केवळ डिव्हाइस बंद करा आणि दोन तास पूर्णपणे शांततेत बसा.

पूर्ण शांत मेंदूच्या सेल्सना रिजनरेट करते, ही प्रक्रिया मेंदूला इतकी मजबूत करते की स्मरणशक्ती चांगली होते. दैनंदिन भावनाही संतुलित राहतात, आधुनिक जीवनात सदैव डिजिटल चॅटर आणि गोंगाट असतो. यामुळे आमची नर्व्हस सिस्टीम थकून जाते, कारण मेंदू सातत्याने सेंसरी इन्फॉर्मेशन प्रोसेस करत राहतो असे न्यूरोसायंटिस्ट्स सांगतात.

Advertisement

परंतु जेव्हा आम्ही डिव्हाइस बंद करून पूर्णपणे शांती निवडतो, तेव्हा मेंदूला आराम मिळतो. शांततेत शरीराची सर्व ऊर्जा मेंदूच्या आत हिप्पोकँपस नावाच्या हिस्स्याच्या दिशेने जाते, हिप्पोकँपस असे ठिकाण आहे, जेथे नव्या ब्रेन सेल्स निर्माण होतात, शांतता या नव्या सेल्सना पोषण देते, जेणेकरून त्या जिवंत रहाव्यात आणि जुन्या नर्व नेटवर्कमध्ये जोडल्या जाव्यात.

ड्यूक युनिव्हर्सिटीचे संशोधन

ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अलिकडेच एक मोठे अध्ययन केले आहे. दैनंदिन दोन तासांची पूर्ण शांतता मेंदूत मोठा बदल घडवितो असे त्यांना दिसून आले. यादरम्यान मेंदू स्वत:ची सर्व ऊर्जा हिप्पोकँपसमध्ये लावतो, तेथे वेगाने नव्या ब्रेन सेल्स निर्माण होऊ लागतात, गोंगाटामुळे या नव्या सेल्स मरून जातात, परंत शांततेत त्या सुरक्षित राहतात. या प्रक्रियेला न्यूरोजेनेसिस म्हटले जाते. न्यूरोजेनेसिक दीर्घ स्मरणशक्तीला मजबूत करते आणि दैनंदिन भावनांना नियंत्रित ठेवते. जेव्हा आम्ही बॅकग्राउंड म्युझिक किंवा आवाज ऐकत असतो, तेव्हा मेंदूला केवळ तात्पुरती उत्तेजना मिळते, परंतु खरा फायदा होत नाही. शांतता या नव्या ब्रेन सेल्सना वाचविते, त्यांना स्थायी स्वरुपात जोडते. यामुळै मेंदूत सेल्युलर डॅमेजची  दुरुस्ती होते. शांतता एक नॅचरल रीसेट बटनप्रमाणे काम करते, यामुळे कॉग्निटिव्ह हेल्थ म्हणजेच विचार-समजण्याची क्षमता सुधारते, मानसिक शक्ती वाढते.

पूर्ण शांततेची पद्धत

ही पद्धत अत्यंत सोपी आहे, दररोज दोन तास फोन, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद ठेवा. खोलीत एकटेच बसा, जेथे कुठलाच आवाज नसेल. प्रारंभी थोडे अवघड वाटेल. परंतु हळूहळू मेंदू स्वत:च शांततेला सरावून जाईल. यामुळे मेंदूच्या सेल्स रिजनरेट होतील, स्मरणशक्ती वाढेल आणि दैनंदिन तणाव कमी होईल. हा छोटा बदल दीर्घकाळापर्यंत मेंदूला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवू शकतो असे वैज्ञानिक सांगतात. आजकाल प्रत्येक जण व्यग्र आहे, परंतु शांततेची ही साधारण पद्धत कुठल्याही खर्चाशिवाय मेंदूला नवे जीवन देऊ शकते. शांतता केवळ आराम नव्हे तर मेंदूची बायोलॉजिकल दुरुस्ती आहे. जर आम्ही याला स्वत:च्या सवयीत रुपांतरित केले तर आमचा मेंदू अधिक तंदुरुस्त, अधिक स्मृती राखणारा राहिल असे न्यूरोसायंटिस्ट्सचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.