Kolhapur : दिलेला शब्द पाळावा; मंत्री हसन मुश्रीफ यांना अंबरिषसिंह घाटगे यांचे आवाहन
कापशी–चिखली मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा
सेनापती कापशी : अन्नपूर्णाकारखान्याच्या उभारणीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मदत केली. त्यावेळी संजयबाबांनी त्यांना शब्द दिला होता की येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तो शब्द आम्ही पाळला. त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दोन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितीच्या जागा देतो, असा शब्द दिला होता. त्यांनी देखील तो शब्द पाळावा, असे आवाहन गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले.
बस्तवडे फाटा, ता. कागल येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद कापशी, चिखली मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सुयशा घाटगे प्रमुख उपस्थित होत्या.अंबरिषसिंह घाटगे यांची बस्तवडे फाटा येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मागणी कार्यकर्ते हे आमचे स्वास्थ्य आणि कवच कुंडले आहेत. त्यांना आम्ही दोन वाऱ्यावर सोडू शकत नाही.
त्यामुळे ठरलेल्या जागा आहेत, त्या मुश्रीफ देतील, अशी आशा आहे. जागेच्या बाबत अदलाबदल करू पण जागेबाबत तडजोड होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी धनराज घाटगे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास एम. बी. पाटील, दत्तोपंत वालावलकर, एकनाथ नार्वेकर, महेश देशपांडे, ए. वाय. पाटील, रणजीत मुडुकशिवाले, मंडल अध्यक्ष एकनाथ पाटील, अॅड. अमर पाटील, उपस्थित होते.