बार असोसिएशनमध्येही महिलांसाठी राखीवता ठेवा
11:17 AM Oct 07, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
ॲड. चन्नबसाप्पा बागेवाडी यांचे बार असोसिएशनला निवेदन
Advertisement
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले पाहिजे. बेळगाव बार असोसिएशननेही आता वकील संघटनेमध्ये महिलांसाठी 33 टक्क्याची राखीवता ठेवावी, अशी मागणी ॲड. चन्नबसाप्पा उर्फ राजू बागेवाडी यांनी बेळगाव बार असोसिएनश अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महिलांना राखीवता दिली पाहिजे, मात्र बेळगाव बार असोसिएशनने आजतागायत त्याबाबत गांभीर्य घेतले नाही. त्यामुळे ॲड. बागेवाडी यांनी बहुसंख्य वकिलांची स्वाक्षरी घेऊन हे निवेदन सादर केले आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर, जनरल सेक्रेटरी ॲड. वाय. के. दिवटे, महिला प्रतिनिधी ॲड. अश्विनी हवालदार, सदस्य ॲड. इरण्णा पुजेरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Next Article