For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केदारलिंग उचगावेला सुवर्णपदक

06:22 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
केदारलिंग उचगावेला सुवर्णपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

येथे सुरु असलेल्या 23 व्या कुमार सुरेंद्रसिंग स्मृती नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सेनादलाचे नेमबाज केदारलिंग उचगावेने सुवर्णपदक तर अजयकुमार अंबवातने रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत सेनादलाच्या नेमबाजांनी 6 पैकी 5 आघाडीची स्थाने मिळवली.

पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारतीय नौदलाच्या उज्ज्वल मलिकने कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात सेनादलाच्या नेमबाजांनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले. सेनादलाच्या केदारलिंग उचगावेने 223.6 गुणासह सुवर्णपदक मिळविले. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता सरबज्योत सिंगला या क्रीडा प्रकारात 18 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Advertisement

कनिष्ठांच्या विभागात चंदीगडच्या धारिया प्रशारने 241.6 गुणासह पहिले स्थान घेत जेतेपद पटकाविले. राजस्थानच्या संदिप बिश्नोईने रौप्य तर हरियाणाच्या कपिलने कांस्यपदक घेतले. चंदीगडच्या धारिया प्रशारने युवा गटात रौप्यपदक मिळविले तर या गटात मध्यप्रदेशच्या युगप्रतापसिंग राठोडने सुवर्णपदक पटकाविले. युवा गटामध्ये सुमारे 500 स्पर्धकांनी तर कनिष्ठ गटामध्ये 300 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता.

Advertisement
Tags :

.