केदार कुचेकरला मेन फिजिक्स स्पर्धेत कांस्य
10:26 AM Dec 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेंगळूर येथे मसल मिनीया इंडिया 2024 च्या नॅचरल चॅम्पियनशीप स्पर्धेत प्रमुख फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या केदार अनंत कुचेकरने आपल्या गटात कांस्यपदक पटकावित यश संपादन केले आहे. यश संपादन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात पात्र ठरला आहे. बेंगळूर येथे झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून जवळपास 150 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. 16 फेऱ्यानंतर केदारने आपल्या बलदंड व पिळदार शरीरराच्या जोरावर तिसऱ्या क्रमांकासह कास्यपदक पटकाविले. यापूर्वीही विविध स्पर्धेत प्रमुख फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेक बक्षीसे पटकाविली आहेत. केदार हा सॉप्टवेअर अभियंता असून आयलाईफ फिटनेस केंद्रात सराव करीत आहे.
Advertisement
Advertisement