For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केईसी इंटरनॅशनलला 1 हजार कोटीचे कंत्राट

07:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
केईसी इंटरनॅशनलला 1 हजार कोटीचे कंत्राट
Advertisement

नवी दिल्ली : बांधकाम क्षेत्रातील केईसी इंटरनॅशनल कंपनीला नुकतेच 1050 कोटी रुपयांचे कामाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. सदरचा कंपनीचा समभाग गुरुवारी शेअरबाजारात सावरताना दिसला आहे. नुकतेच कंपनीला 1050 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. बातमीआधी समभाग बाजारात घसरणीसह कार्यरत होता. पण नंतर दुपारी इंट्रा डे दरम्यान समभाग मात्र काहीसा तेजीकडे सरकु लागला. दक्षिण भारतातील खासगी विकासकाकडून 100 एमडब्ल्यू पवन ऊर्जेचे कंत्राट कंपनीला मिळाले. कंपनीने बिल्डिंग व फॅक्टरीज गटात पश्चिम भारतातील आघाडीवरच्या पोलाद कंपनीचीही प्रकल्पासाठी ऑर्डर प्राप्त केली आहे. आर्थिक वर्षात एकंदर 19300 कोटींच्या कामांचे कंत्राट मिळाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.