केडीडीएलचा समभाग 10 टक्के उसळला
06:18 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
चार हजार कोटी रुपयांचे बाजार भांडवल मूल्य असणाऱ्या केडीडीएलचा समभाग शेअर बाजारात 10 टक्क्यांची उसळी घेताना दिसला. या समभागाची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मागच्या सत्रामध्ये समभाग 2959 रुपयांवर बंद झाला होता. सोमवारी समभागाची सुरुवात 2974 रुपयांवर झाली होती. केवळ 60 मिनिटातच समभाग 3250 रुपयांवर पोहोचला होता. याचदरम्यान समभागाने दहा टक्क्यांपर्यंत उसळी घेतलेली दिसून आली. एका वर्षामध्ये या समभागाने 18 टक्के गुंतवणुकदारांना परतावा दिला आहे. तर तीन वर्षांमध्ये समभागाने 140 टक्के परतावा दिला आहे.
Advertisement
Advertisement