For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा संघ निवडीसाठी केडीसीएची अनोखी संकल्पना; ग्रामिण टॅलेंटलाही संधी, खेळाडूंना महाराष्ट्र निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत संधी

06:58 PM Nov 08, 2023 IST | Abhijeet Khandekar
जिल्हा संघ निवडीसाठी केडीसीएची अनोखी संकल्पना  ग्रामिण टॅलेंटलाही संधी  खेळाडूंना महाराष्ट्र निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत संधी
Advertisement

यंदाच्या क्रिकेट हंगामात अंमलबजावणी : साखळी सामने खेळवून निवडणार वरिष्ठ गट संघ व 19 वर्षाखालील मुलांचा संघ, ग्रामिण टॅलेंटला ही संधी, निवडलेले संघ महाराष्ट्र निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत खेळणार

Advertisement

कोल्हापूर संग्राम काटकर

नुकत्याच सुऊ झालेल्या क्रिकेट हंगामासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (केडीसीए) कोल्हापूरसह जिह्यातील क्रिकेट संघांमधील खेळाडूंना पॅरफॉमन्स करावाच लागेल अशी अनोखी संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पनेनुसारच कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ गट संघ व कोल्हापूर जिल्हा 19 वर्षाखालील मुलांचा संघ निवडला जाणार आहे. संघ निवडीसाठी वरिष्ठ गट व 19 वर्षाखालील मुलांचा गट या दोन्ही गटातील प्रत्येकी सहा संघांमध्ये साखळी सामने खेळवले जातील. यात उत्कृष्ट खेळणाऱ्या प्रत्येकी 20 खेळाडूंचा जिल्हा वरिष्ठ संघ व जिल्हा 19 वर्षाखालील मुलांचा संघ बनवला जाईल. या संघात ग्रामिण भागातील खेळाडूंनाही स्थान मिळवता येणार आहे. त्यामुळे शहरी टॅलेंटबरोबरच ग्रामिण टॅलेंटमधील संघातून दिसणार आहे. शिवाय टॅलेंटला कन्सिटन्सी परफॉर्मन्स करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

Advertisement

साखळी सामन्यांमधून निवडले जाणारे कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ संघ व कोल्हापूर जिल्हा 19 वर्षाखालील मुलांचा संघ हा यंदा होणाऱ्या महाराष्ट्र निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत दाखल केला जाणार आहे. दरम्यान, आजवर केडीसीएकडून ठराविक दिवशी निवड चाचणी घेऊन दोन्ही संघ निवडला जात होता. यंदाच्या क्रिकेट हंगामात राबवल्या जाणाऱ्या अनोख्या संकल्पनेमुळे आता जिल्हा संघ निवडीसाठी चाचणीच होणार नाही. त्याऐवजी यंदाच्या क्रिकेट हंगामात वरिष्ठ गटाअंतर्गत होणाऱ्या (कै.) बाबा भोसले करंडक क्रिकेट स्पर्धा व 19 वर्षाखालील मुलांच्या गटाअंतर्गत होणाऱ्या (कै.) मालती पाटील चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून वरिष्ठ गट व 19 वर्षाखालील मुलांचा संघ निवडण्यात येणार आहे.

....अशी होईल कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ गट संघाची निवड
कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ गट संघात 20 खेळाडूंना स्थान असेल. त्यासाठी केसीडीएकडून यंदाच्या हंगामात आयोजित होणाऱ्या (कै.) बाबा भोसले करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या 4 व उर्वरीत 8 संघांमध्ये उत्कृष्ठ खेळलेल्या खेळाडूंचे मिळून दोन संघ तयार केले जातील. या संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील. या सामन्यात उत्कृष्ट खेळणारे खेळाडू, ग्रामिण भागात केडीसीएच्या माध्यमातून आयोजित केलेल्या चाचणीतील उत्कृष्ट खेळाडू आणि सध्या सुऊ असलेल्या माजी आमदार स्वर्गीय दिनकरराव यादव चषक ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धेत उत्तम खेळलेले खेळाडू असा 20 जणांचा संघ निवडला जाईल.

असा निवडला जाणार कोल्हापूर जिल्हा 19 वर्षाखालील मुलांचा संघ
कोल्हापूर जिल्हा 19 वर्षाखालील मुलांच्या संघासाठी 20 खेळाडूची निवड केली जाईल. त्यासाठी यंदाच्या हंगामात होणाऱ्या 19 वर्षाखालील मुलांच्या गटाअंतर्गत होणाऱ्या (कै.) मालती पाटील चषक ा†क्रकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गेलेले चार व उर्वरीत आठ संघातून निवडलेला 1 संघ आणि तालुका पातळीवर होणाऱ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा 1 संघ अशा संघात साखळी सामने खेळवले जातील. या सामन्यांमध्ये उठावदार खेळ करणाऱ्या 20 जणांचा जिल्हा संघ निवडला जाईल.

...म्हणून साखळी सामन्यांमधून निवडले जाणार जिल्हा संघ
मागील अनेक वर्षांपासून केडीसीएतर्फे संघ निवड चाचणी आयोजित कऊन कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ संघ व कोल्हापूर जिल्हा 19 वर्षाखालील मुलांचा संघ निवडला जातोय. मात्र खेळाडूकडे गुणवत्ता आहे आणि पण चाचणीतच सुमार कामगिरी झाली तर त्याला जिल्हा संघात स्थान मिळत नव्हते. याशिवाय शहरी खेळाडूंमुळे ग्रामिण भागातील खेळाडूंनाही संघात स्थान मिळणे कठिण जाते. असे घडू नये यासाठी केडीसीएने यंदाच्या हंगामापासून 6 संघात साखळी पद्धतीने सामने खेळवून त्यातील उत्कृष्ट खेळाडूंचे जिल्हा संघ निवडण्याची संकल्पना हाती घेतली आहे.
केदार गयावळ (सचिव : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन)

ग्रामिण भागातील टॅलेंटलाही मिळणार संधी
कोल्हापूर शहरातील बहुतांश टॅलेंटेड खेळाडू जिल्हा संघात स्थान मिळवत असतात. त्यामुळे ग्रामिण भागातील टॅलेंटला वाव मिळत नाही. असे भविष्यात घडू नये यासाठी केडीसीएने प्रत्येक तालुका असोसिएशनला संघ तयार करण्यास सांगितले आहे. सर्व असोसिएशनने मनावर घेऊन संघही तयार केले आहेत. या संघात होणाऱ्या स्पर्धेचे जेतेपद मिळणाऱ्या संघातील खेळाडूंनाही आता जिल्हा संघातून महाराष्ट्र निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधीत्व करता येणार आहे.
चेतन चौगुले (अध्यक्ष-कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन)

Advertisement
Tags :

.