कावासाकी निंजा-300 मोटरसायकल सुधारित रूपात लॉन्च
गाडीची किंमत 3 लाखावर : नव्या बदलांसह सादर
चेन्नई : कावासाकीच्या सर्वात लोकप्रिय मोटरसायकलमध्ये निंजा-300 या गाडीचा उल्लेख आवर्जून केला जातो. कावासाकीची ही निंजा-300 ही गाडी आता नव्या रुपामध्ये सादर केली गेली आहे. या गाडीची एक्सशोरूम किंमत 3 लाख 17 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. स्पोर्ट्स बाईक आधारावरची ही मोटरसायकल काही ठराविक बदलांसह सादर करण्यात आली आहे. या गाडीला 296 सीसीचे पॅरेलल ट्वीन, लिक्विड कुल्ड इंजिन दिले गेले असून बाईकमध्ये सहा स्पीड गिअरबॉक्स दिला गेला आहे. नव्याने एलईडी हेडलाईट देण्यात आले असून यामुळे गाडीला स्पोर्टी आणि आधुनिक लुक प्राप्त झाला आहे. चालकाच्या सुरक्षेसाठी विंडक्रीन लावली गेली आहे. सदरची गाडी ही लाईम ग्रीन आणि कॅन्डी लाईम ग्रीन या दोन रंगांमध्ये सादर केले गेले आहे. या गाडीचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत शोरूममध्ये सुरू झालेले आहे.