महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डीजेला शॉक लागून कावडियाचा मृत्यू

06:42 AM Aug 09, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इंदोर / वृत्तसंस्था

Advertisement

मध्यप्रदेशातील इंदूर जिल्हय़ातील महू येथे कावड यात्रेदरम्यान विजेच्या धक्क्याने एका कावडियाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. वाहनातील साऊंड सिस्टीमवर चढून डीजेच्या तालावर नाचणाऱया तरुणाच्या हाताला 11 हजार किलोवॅट क्षमतेच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्यामुळे विद्युतप्रवाह वाहनात पसरला. विजेचा झटका लागल्याने काही तरुण खाली कोसळल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सोमवारी इंदोरनजिकच्या सिमरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. हा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला. गेल्या आठवडय़ात पश्चिम बंगालमध्येही अशीच एक घटना घडली होती. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये पिकअपला विजेचा धक्का लागून 10 कावडियांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article