For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | शिवराज्याभिषेकासाठी कवड्यांची माळ-कुंकू रवाना

11:36 AM Jun 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news   शिवराज्याभिषेकासाठी कवड्यांची माळ कुंकू रवाना
Advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५२ वा सोहळा
तुळजापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५२ वा सोहळा ६ जून रोजी रायगडावर साजरा होत आहे. सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथून आई तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केलेले कुंकू, १०८ अबुंकी कवड्यांची माळ तसेच शिरकाई देवीसाठी साडी-चोळी व ओटीचे साहित्य मंगळवार, २ जून रोजी रायगडाकडे रवाना करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या चरणी पूजित झालेले कुंकू आणि १०८ कवड्यांची माळ दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पाठविण्याची परंपरा आहे. यावर्षीही तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने हे पूजेचे साहित्य नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले.
रायगडावरील राजसदरेवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी परिधान करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या १०८ अबुंकी कवड्यांच्या माळांसह जगदीश्वर मंदिर, गडदेवता शिरकाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, होळीवरील पुतळा तसेच पालखी सोहळ्यातील महाराजांच्या पुतळ्यासाठी स्वतंत्र माळा पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे, मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद गंगणे, मंदिर व्यवस्थापक माया माने, रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मानकरी सतीश खोपडे, गणेश पुजारी, महेश गवळी, शिवशंकर म्हामाणे, गणेश भिंगारे आदींची उपस्थिती होती.
Advertisement

 

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.