‘कौशलजी वर्सेस कौशल’ प्रदर्शित
आशुतोष राणा मुख्य भूमिकेत
कौशलजी वर्सेस कौशल या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला होता. चालू महिन्यात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात आशुतोष राणा आणि शीबा चड्ढा यांनी एका जोडप्याची भूमिका साकारली आहे. परंतु याच्या कहाणीला दोघेही विभक्त होण्याचा विचार व्यक्त करताच नवे वळण मिळते. या कहाणीला हास्यपूर्ण शैली तसेच भावनाप्रधानपणे चित्रित करण्यात आले आहे.
27 वर्षीय युग कौशलची ही कहाणी आहे. युग हा कनौज येथून दिल्लीत स्थायिक झालेला असतो. तो स्वत: मॉडर्न होण्यासोबत स्वत:च्या आईवडिलांनाही मॉडर्न होण्याचा सल्ला देतो. अशास्थितीत त्याचे आईवडिल मॉडर्न होण्याच्या विचारासोबत विभक्त होण्याची इच्छा व्यक्त करतात, अशास्थितीत धक्का बसलेला हा कौशल काय करतो हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट नाते, प्रेम आणि विवाहाच्या आधुनिक अडचणींवर चांगला दृष्टीकोन मांडणारा आहे. यातील व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी रोलर-कोस्टरच्या राइडप्रमाणे असेल आणि त्यांच्या मनाला स्पर्श करणारा असेल असे आशुतोष राणा यांनी म्हटले आहे. विवाह केवळ प्रेमाविषयी नव्हे तर समजंसपणा, तडजोड आणि कधीकधी निरर्थक भांडणांवायी देखील असतो. यातील माझ्या व्यक्तिरेखला अनेक महिला स्वत:शी जोडू शकतील असे शीबा चड्ढा यांनी म्हटले आहे. 21 फेब्रुवारी रोजी जियो हॉटस्टारवर कौशलजी वर्सेस कौशल या चित्रपटाचा प्रीमियर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सीमा देसाई यांनी केले आहे. तर ईशा तलवार, ग्रूशा कपूर, ब्रजेंद्र काला हे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.