अकरा हजार दिव्यांच्या प्रकाशात उजळले कात्यांयनी मंदिर
कोल्हापूर :
कळंबा येथील श्री कात्यायनी मंदिर परिसरात शुक्रवारी त्रिपुरी अर्थात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सलग 26 व्यावर्षी मैत्री हायकर्स यांच्या संयुक्त विघमानाने चार हजार भक्तांच्या उपस्थितीत सुमारे अकरा हजार दिवे प्रज्वलित करून कात्यायनी मंदिर परिसर उजळून निघाला. पौर्णिमा निमित्य मंदिरात तीन हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराला आकर्षक अशी फुलांची आरास तसेच मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी आरती नंतर मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून अतिषबाजी करण्यात आली शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस त्रिपुरी पौर्णिमा तिथी आहे. शुक्रवारी पहाटे त्रिपुरी पौर्णिमेला प्रारंभ झाला असून ती शनिवारी पर्यंत असणार आहे. याचेच औचित्य साधून सुमारे चार हजार भाविकांनी मंदिराच्या परिसरात अकरा हजार पणती द्वारे दीपोस्तव साजरा केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सायंकाळच्या अंधारात पौर्णिमेच्या चंद्राच्या मंद प्रकाशात हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत होते. दरम्यान त्रिपुरी पौर्णिमे निमित्त कात्यायनी देवीची आकर्षक सालंकृत रूपात पूजा बांधण्यात आली होती. मंदिरात सकाळी अभिषेक, दुपारी साडेबारा वाजता देवीची आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी देवीची आरती, असे विविध कार्यक्रम पार पडले.यावेळी मैत्री राहुल चव्हाण, प्रविण पोवार, विद्यसागर चव्हाण, वैभव कागले, आनंद उरुणकर, महेश गुरव, अतुल इंगवले,सलीम फरास, सचिन यादव,आशुतोष चव्हाण, नेमिनात पाटील, आशुतोष चव्हाण, प्रीतम बुलबुल, बंडोपंत पोवार, देवीचे पूजारी वैभव गुरव, राजू गुरव तसेच बलिंगा उत्सव समिती व भाविक अदी उपस्थित होते.