‘गूडबाय जून’मध्ये केट विन्स्लेट
ऑस्कर, बाफ्ता आणि प्राइम टाइम यासारखे पुरस्कार पटकाविणारी ख्यातनाम अभिनेत्री केट विन्स्लेट आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. तिच्या दिग्दर्शनातील पदार्पपणाचा चित्रपट ‘गूडबाय जून’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो परिवारातील प्रेम, तणाव आणि भावनांचे द्वंद दाखविणारा आहे. गूडबाय जून या चित्रपटाचे दिग्दर्शन केटने केले असून तिच चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. केटसोबत या चित्रपटात टोनी कोलेट, हेलेन मिरेन, टिमोथी स्पाल आणि स्टीफन मर्चंट यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गूडबाय जून एक कौंटुंबिक इमोशनल ड्रामा असून याची कहाणी केटचा पुत्र जो एंडर्सने लिहिली आहे. परिवारात प्रेम आहे, परंतु नात्यांमध्ये तणाव देखील आहे, या नात्यांना जोडून ठेवण्याचे काम आई जून करते, जूनच्या खराब प्रकृतीमुळे पूर्ण परिवार एकत्र येतो. त्यांच्यादरम्यान मतभेद, कलह, प्रेम आणि भावना व्यक्त करणारी कहाणी मनस्पर्शी आहे. गूड बाय जून 12 डिसेंबर रोजी निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.