दिग्दर्शनाचा क्षेत्रात पदार्पण करणार केट
लवकरच सुरू होणार ‘गुडबाय जून’
टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी ठरल्यावर आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. केट ही नेटफ्लिक्ससाठी ‘गुडबाय जून’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी तयार आहे. ऑस्कर विजेती अभिनेत्री या चित्रपटात अभिनय देखील करणार आहे आणि तीच निर्मिती करणार आहे. या चित्रपटात टोनी कोलेट, जॉनी फ्लिन, एंड्रिया राइजबोरो, टिमोथी स्पाल आणि हेलेन मिरेन मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाची कथा केटचे पूर्वाश्रमीचे पती सॅम मेंडेस यांचा पुत्र जो एंडर्सने लिहिली आहे. केट ही सोलोमन विन्सलेटसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. गुडबाय जून हा चित्रपट मनस्पर्शी आणि विनोदी धाटणीचा असेल. यात भावाबहिणीचा एक तुटलेला समूह अचानक आणि कठिण स्थितीत एकत्र येत असल्याचे दाखविले जाईल, असे नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आले. केटने यापूर्वी एचबीओची सीरिज ‘द रेजीम’मध्ये काम केले होते. याकरता तिला गोल्डन ग्लोब नामांकनही मिळाले हेते. 2009 साली ‘द रीडर’मधील स्वत:च्या अभिनयासाठी केटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला होता.