For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काशिनाथ शेट्योंची चौघांविरोधात पोलिसात तक्रार

07:45 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
काशिनाथ शेट्योंची  चौघांविरोधात पोलिसात तक्रार
Advertisement

काशिनाथ शेट्यो यांना जीवे मारण्याची धमकी  

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

बोगदा-वास्को येथील सरकारी जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करून वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्यो यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काशिनाथ शेट्यो यांनी काल शनिवारी पणजी पोलीस स्थानकात बोगदा येथील चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी झिरो एफआयआर नोंद करून वास्को पोलीस स्थानकात पाठविली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांमध्ये ओमकार दुर्भाटकर, यश फडते, सुधीर तारी व योगेश पाटील यांचा समावेश आहे. चारही संशयितांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी बोगदा वास्को येथे वीज खात्याच्या मालमत्तेत पडून असलेले केबल्स हटवताना येथील बार मालक आणि इतरांनी शेट्यो यांच्या कामात हस्तक्षेप करत त्यांची अडवणूक केली. दरम्यान काहीवेळाने स्थानिक आमदार संकल्प आमोणकर तेथे पोहोचले. यानंतर दोघांत वाद निर्माण झाला. यावेळी संशयितांनी शेट्यो यांना वास्कोत आल्यास जीवे मारणार, अशी धमकी दिली होती.

अन्यथा न्यायालयात जाणार

पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर काशिनाथ शेट्यो म्हणाले की, संशयितांविरोधात आपण तक्रार दाखल केली आहे. चारही संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला नाही तर आपण न्यायालयात जाणार आहे.

आमदार संकल्प आमोणकर यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार 

संशयितांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने खात्यालासुद्धा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आता आम्ही काय करावे, असा प्रश्न शेट्यो यांनी उपस्थित केला आहे. माझी वैयक्तिक सुरक्षा आहे. त्यामुळे मला सुरक्षारक्षक किंवा अन्य सुरक्षेची गरज नाही. मी कुणाच्या धमकीला भीत नाही, असे सांगून शेट्यो म्हणाले की, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या विरोधात मी तक्रार केली नाही. कारण त्यांनी मला धमकी दिली नाही मात्र काम करण्यापासून रोखताना त्यांनी मला काही अपशब्द उच्चारले आहे. त्यासाठी त्यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली जाईल, असेही काशिनाथ शेट्यो यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.