कसबा बीड ते बीडशेड दरम्यान 'सोन्याचा माळ' येथे एसटी थांबा करा! विद्यार्थी व नागरिकांची मागणी
कसबा बीड वार्ताहर
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील बीडगाव ते बीडशेड दरम्यान असलेल्या सोन्याचा माळावर बसस्थांबा करावा अशी मागणी येथील विद्यार्थी आणि नोकरदार तसेच नागरिकांनी केली आहे. या ठिकाणच्या रहीवाशांना बसस्टॉपचे अंतर जास्त पडत असल्य़ाने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी बसस्टॉप व्हावा या मागणीचे निवेदन नागरिकांनी एस.टी. च्या विभागीय कार्यालय तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या केएमटीच्या कार्यालयात देण्यात आले आहे.
कसबा बीड गाव ते बीडशेड दरम्यान गेल्या अनेक बर्षापासून बसस्टॉप करण्याची मागणी नागरिकांची आहे. वाढती लोकसंख्या व नविन झालेल्या वसाहतहीमुळे तेथील स्थानिक नागरिक व विद्यार्थी यांना कोल्हापूर व शिरोली दुमाला आदी भागात जाण्यासाठी एस.टी.ने प्रवास करतात.
पण एस.टी. ने प्रवास करायचा झाला तर कसबा बीड गावात किंवा बीडशेड येथे जावे लागते. विद्यार्थ्यांना कॉलेज जाण्यासाठी पायपीट प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सोन्याचा माळ येथे राहणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोप होत आहे. ही गैरसोच दूर व्हावी म्हणून सोन्याचा माळ येथे एस.टी. थांबा व्हावा असे लेखी निवेदन एस.टी. विभागीय कार्यालयात देण्यात आले आहे. तरी लवकरात लवकर येथे एस.टी थांबा व्हावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.