For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कासारवर्णे सरकारी विद्यालयात तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडून दारूच्या बाटल्यांचा खच; पोलीस घटनास्थळी दाखल; समाजकंटकांवर कठोर कारवाईची पालकांची मागणी

10:21 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
कासारवर्णे सरकारी विद्यालयात तोडफोड  खिडक्यांच्या काचा फोडून दारूच्या बाटल्यांचा खच  पोलीस घटनास्थळी दाखल  समाजकंटकांवर कठोर कारवाईची पालकांची मागणी
Advertisement

पेडणे : कासारवर्णे गावातील सरकारी विद्यालयाच्या आवारात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. शाळेच्या खिडक्यांच्या काचा फोडून तसेच दारूच्या बाटल्या फोडून त्या संपूर्ण शाळेच्या परिसरात टाकण्यात आल्याचे आढळून आले.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची पाहणी करण्यात आली. शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात फुटलेल्या काचा आणि दारूच्या बाटल्यांचे तुकडे आढळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेच्या परिसरात अशा प्रकारे तोडफोड करून मद्याच्या बाटल्या फोडून टाकणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच शाळेच्या परिसरात रात्रीच्या वेळी अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी परिसरातील माहिती घेतली जात आहे.

Advertisement
Tags :

.