For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाहुण्यांचीच घरे फोडणाऱ्या कसाई गल्लीच्या चोराला अटक

07:01 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाहुण्यांचीच घरे फोडणाऱ्या कसाई गल्लीच्या चोराला अटक
Advertisement

दु:खद घटनेवेळी सांत्वनेसाठी जाऊनही घरफोडी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

आपल्याच पाहुण्यांची घरे लक्ष्य बनविणाऱ्या कसाई गल्ली येथील विक्षिप्त चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून तब्बल 25 लाख 35 हजार रुपये किमतीचे 169 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, उपनिरीक्षक उदय पाटील, उपनिरीक्षक पी. एम. मोहिते, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्नकुमार, सिद्धार्थ, बसवराज बस्तवाड, अरुण कांबळे, एम. जी. कुरेर, जगन्नाथ भोसले, बी. एम. कल्लप्पन्नावर, सी. जी. चिन्नाप्पगोळ, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, महेश वडेयर, मल्लिकार्जुन गाडवी व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद, दीपक दोडगोनी आदींनी ही कारवाई केली आहे.

अश्पाक खाजासाब साठी (वय 42) राहणार कसाई गल्ली असे त्या विक्षिप्त युवकाचे नाव आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी यासंबंधी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. अश्पाकने बेळगाव येथील अमननगर, न्यू गांधीनगर व कोल्हापूर येथे आपल्याच नातेवाईकांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तिन्ही प्रकरणात त्याने चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

अश्पाकला ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक कबुली दिली. अमननगर व न्यू गांधीनगर येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तो आला होता. त्यानंतर पाहुणे घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर त्याने घरफोडी केली आहे.

कोल्हापूर येथील नातेवाईकांच्या घरी तर दु:खद प्रसंग होता. अश्पाकच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यामुळे सर्व कुटुंबीय दु:खात होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावर जाऊन अश्पाकने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव व कोल्हापूर येथे त्याने आपल्याच नातेवाईकांच्या घरी चोऱ्या केल्या आहेत. त्याला अटक करून तब्बल 25 लाख 35 हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

Advertisement
Tags :

.