केएएस परीक्षोत्तर प्रक्रिया 20 दिवसांत पूर्ण : बोसराजू
बेळगाव : 2023-24 या वर्षासाठी 384 गॅझेटेड प्रोबेशनर्स पदांच्या भरतीसाठी कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत 3 मे 2025 ते 9 मे 2025 या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली. सद्यस्थितीत मुख्य परीक्षेच्या परीक्षेनंतरच्या कामकाजाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पुढील 20 दिवसांत पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावतीने लघु पाटबंधारे मंत्री एन. एस. बोसराजू यांनी दिली. विधानपरिषदेत भाजपचे सदस्य हनुमंत निराणी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मंत्री बोसराजू यांनी उत्तर दिले. सदस्य निराणी यांनी 384 केएएस गॅझेटेड प्रोबेशनर्स पदांची भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे, तसेच नोव्हेंबर 2025 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश या केएएस भरतीला लागू होईल का? असा प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना बोसराजू म्हणाले, न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश सदर भरती प्रक्रियेलाही लागू होणार आहे, असे सांगितले.