For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवारचे म. ए. समिती उमेदवार निरंजन सरदेसाई सोमवारी अर्ज भरणार

10:26 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवारचे म  ए  समिती उमेदवार निरंजन सरदेसाई सोमवारी अर्ज भरणार
Advertisement

खानापुरात सकाळी 6.30 वा. कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन

Advertisement

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक येथील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आबासाहेब दळवी यांनी कारवार लोकसभा मतदार संघाची म. ए. समितीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी विचार व्यक्त करण्यात यावेत, असे आवाहन केले. यानंतर उपस्थित समिती कार्यकर्ते राजाराम देसाई, बाळाराम शेलार, विलास बेळगावकर, कृष्णा कुंभार, वसंत नावलकर, गोपाळ तीनेकर, रमेश धबाले, जयराम देसाई, मारुती परमेकर, मुकुंद पाटील, समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांची भाषणे झाली. यानंतर सोमवारी दि. 15 रोजी कारवार येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कारवार येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी सकाळी साडेसहा वाजता खानापूर शिवस्मारक येथे समिती कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता शिवाजी महाराजांना अभिवादन करून कारवारला रवाना होणार आहेत. तरी समितीप्रेमी कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी साडेसहा वाजता शिवस्मारक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, अमृत शेलार, मऱ्यापा पाटील, सुनील पाटील, प्रल्हाद घाडी, विवेकानंद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.