For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कारवार भाजप प्रचाराची सुरुवात यल्लापूरमधून

10:23 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार भाजप प्रचाराची सुरुवात यल्लापूरमधून

खासदार अनंतकुमार हेगडे, आमदार शिवराम हेब्बार यांची बैठकीला गैरहजेरी

Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराची प्रचाराची रूपरेषा ठरविण्यासाठी बुधवारी यल्लापूर येथील एपीएमसीच्या रयत भवनात भाजपच्या मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना उद्देशून बोलताना कारवारच्या माजी आमदार आणि राज्य उपाध्यक्षा रूपाली नाईक म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वांनी स्वच्छ मनाने कार्य करून कारवार मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना निवडून आणले पाहिजे. बुथ पातळीवर प्रचार कार्याला वाहून घेऊया. अयोध्या येथील राममंदिर उभारणीसाठी गेल्या काही शतकापासून अनेकांनी संघर्ष केला आहे. दरम्यान, या मुद्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घातले. आणि सांगितलेल्या तारखेला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून दाखविली. येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने 400 खासदारांचा संकल्प केला आहे. या संकल्पाची पूर्तता करूनच विश्रांती घ्यायची, असे आवाहन पुढे रूपाली नाईक यांनी केले.  बैठकीला कुमठाचे आमदार दिनकर शेट्टी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, विधान परिषद सदस्य शांताराम सिद्धी, खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील, हल्याळचे माजी आमदार सुनील हेगडे, भटकळचे माजी आमदार सुनील नाईक, प्रमोद हेगडे, प्रमोद कोचेरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एन. एस. हेगडे, माजी अध्यक्ष वेंकटेश नायक, धनश्री सरदेसाई, हरताळ हालप्पासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तथापि बैठकीला विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे, यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार उपस्थित नव्हते.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.