सोहळा आनंदाचा...बाप्पांच्या आगमनाचा ! दहा दिवसांच्या गणेशपर्वाला आजपासून प्रारंभ
घरोघरी अन् मंडळामंडळात होणार बाप्पांची प्रतिष्ठापना, सकाळी घरगुती आणि दुपारी सार्वजनिक मंडळाच्या निघणार गणेश आगमन मिरवणूका
कोल्हापूर प्रतिनिधी
हे गणराया...आस लागली तुझ्या दर्शनाची...तुला डोळेभऊन पाहण्याची...सजले घरदार, मंडळ तुझ्या प्रतिष्ठापनसाठी...अन् मनोहारी पहाट उजडू दे गणराया तुझ्या आगमनासाठी...अशी जणू साद घालत करवीरनगरीमध्ये शनिवार 7 रोजीपासून गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. मांगल, उत्साह, चैतन्य आणि भक्तीभाव चराचरा भरणारा लाडका बाप्पा घरोघरी सहा दिवसांसाठीच्या मुक्कासाठी येणार आहे. तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये हाच बाप्पा 10 दिवसांचा मुक्काम करणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाची लहर उमटली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तन, मन लावून वाट पाहिली जाणारा बाप्पा घराघरासह मंडळा-मंडळात दाखल होईल आणि खऱ्या अर्थाने गणेशपर्व आणि आरती सोहळ्यांना प्रारंभ होईल.
गेल्या काही महिन्यातील कटु अनुभवांना विसऊन जात किंबहूना त्याकडे कानाडोळा करत अवघी करवीरनगरी बाप्पांच्या स्वागतासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाली आहे. बाप्पांच्या प्रतिष्ठापनेला आता काहीच तासांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे गेले काही दिवस बाजारपेठेतून पायपीट करत खरेदी केलेल्या साहित्यांनी घराघरात केल्या जाणाऱ्या बाप्पांच्या प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी मनमोहक आरास केली. तालीम संस्था, मंडळे विद्यूत रोषणाईने उजळून सोडली आहेत. मंडळांचा परिसर जाहीरातींच्या फलक, लाईटच्या माळा आणि चौक स्वागत कमानींनी नटले आहेत. अशा सगळ्या वातावरणात शनिवारची पहाट उजाडल्यानंतर गणेश आगमनचा सिलसिला सुऊ होईल. सकाळी घरगुती गणेशभक्तांकडून पारंपरिक बाज कायम ठेवत मिरवणूकीने बाप्पांचे आगमन करण्यात येईल. बाप्पांचे घरी आगमन झाल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी एक धांदल उडेल. प्रात:कालापासून ते मध्याह्नकाळापर्यंत प्रतिष्ठापनेसह विविध प्रकारचे धार्मिक करण्यासाठी कोणत्याही ठराविक वेळेचे यंदाही बंधन नाही. त्यामुळे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंतच्या कोणत्याही वेळेत घरगुती गणेशभक्तांना आपल्या घरी केलेल्या सुंदर आराशीमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करता येणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर भक्तीरस पाझरणारे आणि देवदेवतांची आळवणी करणारे आरती सोहळे रंगायला सुऊवात होईल.
दिवस जसा दुपारकडे झुकू लागले तशा तालीम संस्था, मंडळांच्या गणेश आगमन मिरवणूकांचा धडाका सुऊ होईल. या मिरवणूकांमध्ये होणारा साऊंड सिस्टीम, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजर करवीरनगरी गर्जुन जाणार आहे. काही मंडळांनी आपल्या गणेश आगमन मिरवणूकीत जाणिवपुर्वक पारंपरिक वाद्ये दाखल करण्याचा निर्धार केला आहे. तर काही मंडळांनी इतर मंडळांशी ईर्ष्या करण्यासाठी आपल्या गणेश आगमन मिरवणूकांमध्ये साऊंड सिस्टीम लावण्याची मोठी तयारी केली आहे. या मिरवणूका जशा सायंकाळाच्या वातावरणात प्रवेश करतील, तशा त्या मंडळांकडून लावण्यात येणारे शारपे आणि लेझर-शोने उजळून निघतील. साऊंड सिस्टीम आणि वाद्यांच्या दणदणाटाच्या वातावरणाच मिरवणूका रात्री उशिरापर्यंत गाजत राहतील.
दरम्यान, घरगुती व छोट्या-छोट्या मंडळाकडून निघणाऱ्या मिरवणूकांमधून घरसंसारासाठी चार पैसे जास्तीची कमाई करण्यासाठी अनेकांनी हातागाड्या व वेगवेगळी वाहने कुंभार गल्ल्यांमध्ये आणली आहे. बाप्पांच्या मिरवणूकीसाठी आपल्याच हातगाडी व वाहनांना घरगुती गणेशभक्त व मंडळांची पसंती मिळावी यासाठी त्यांना आरास साहित्यातील फुले, मनी आणि फळांच्या लटकणी व विद्युत रोषणाईने आकर्षक पद्धतीने सजवले आहे. हातगाडी मालकांकडून मिरवणूकीसाठी तासाला 1 हजार ऊपयांपर्यंत तर वाहन मालकांकडून तासाला 2 ते 3 हजार ऊपये भाडे आकारण्यात येणार आहे. शहरातील कुंभार गल्ल्यांमधील मोक्याच्या ठिकाणी या सजवलेल्या हातगाड्या व वाहने लावण्यात आली आहे.
पूजा साहित्याचे उभारले स्टॉल...
बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे पूजा साहित्य विक्रीचे कुंभार गल्ल्यांसह, शहरातील तिकटी, चौक, प्रसिद्ध ठिकाणे व उपनगरांमध्ये सामान्य व गरीब कुटुंबातील विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या साहित्यासह भगव्या रिबन्स, भगव्या टोप्या, गणेशमूर्तीचे उपर्ण, आसन, रेशमी हार, मनी हार, फाया, श्रीफळ आदी सर्व काही मांडण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या पुर्वसंध्येपासूनच गणेशभक्त व मंडळे स्टॉलला भेटी देऊन आवश्यक ते साहित्य खरेदी करत आहेत. त्यामुळे स्टॉलधारकांची चांगली कमाई झाली आहे.
परगाव व परजिह्यातून वाद्ये कोल्हापूरात दाखल...
घरगुती गणेशभक्त व तालीम संस्था, मंडळांकडून मोठ्या हौसेने काढण्यात येणाऱ्या गणेश आगमन मिरवणूकामधून हक्काची कमाई करण्यासाठी परगाव व परजिह्यातील पारंपरिक वाद्ये पथके कोल्हापूरात आली आहेत. यामध्ये पाडळी, पेठवडगाव, तासगाव, कराड, सातारा, मेढा, शिरसगाव काटा (पुणे), सोलापूर येथील पथकांचा समावेश आहे. ही सर्व पथके बापटकॅम्प, गंगावेशसह सर्वच कुंभार गल्ल्यांच्या ठिकाणी थांबली आहे. या पथकांचा ताशी दर 3 हजार ऊपयांपासून ते अगदी 25 हजार ऊपयांपर्यंत आहे. जसे पैसे वाढतील, तसे मिरवणूकीसाठी वाद्य पथका मालकाकडून वादक दिले जाणार आहे.