करुणाकरण-वरियथची मिश्र दुहेरीत आगेकूच
वृत्तसंस्था/जकार्ता
सतीश कुमार करुणाकरण आणि आद्या वरियथ यांनी इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. परंतु ड्रॉमधील इतर सर्व भारतीय जोड्या बुधवारी पराभवामुळे बाहेर पडल्या. करुणाकरण आणि वरियथ यांनी 45 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात चिनी तैपेईच्या ये हाँग वेई आणि निकोल गोंझालेस चान यांना 15-21, 21-16, 21-17 असे पराभूत केले. रोहन कपूर व रुत्विका शिवानी ग•s यांना युची शिमोगामी-सायाका होबारा या जपानी जोडीने 14-21, 9-21 असे पराभूत केले. आशिथ सूर्या-अमृता प्रमुथेश या मॅड्स वेस्टरगार्ड आणि क्रिस्टीन बुश यांच्याकडून 15-21, 9-21 अशा पराभूत झाल्या. ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांनाही दुसऱ्या मानांकित तांग जी चेन आणि मलेशियाच्या ई वेई तोह यांच्याविरुद्ध 11-21, 21-16, 14-21 असा पराभव पत्करावा लागला.