कुरळचे माजी सरपंच दत्तात्रय फोपे यांचे निधन
05:30 PM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरळ गावचे माजी सरपंच तसेच काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले दत्तात्रय देऊ फोपे उर्फ ‘फोपे सरपंच’ (85) यांचे मंगळवारी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
Advertisement
दत्तात्रय फोपे यांनी कुरळ ग्रामपंचायतीचे सलग २९ वर्षे सरपंचपद भूषविले. बुधवारी कुरळ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement