For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थानात कार्तिकोत्सव-महाप्रसाद

12:13 PM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थानात कार्तिकोत्सव महाप्रसाद
Advertisement

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये रविवार दि. 9  रोजी कार्तिकोत्सव साजरा करण्यात आला. कार्तिकोत्सवाचे यंदाचे 66 वे वर्ष असून रात्री 8 वाजता भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्तिकोत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता होमहवन, 9 वाजता लघु रुद्राभिषेक, 11 वाजता सत्यनारायण पूजा, 12 वाजता महाआरती करण्यात आली. सायंकाळी 7 वाजता कार्तिकोत्सव पार पडला. रात्री 8 वा. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाला बेळगाव शहर व परिसरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्तिकोत्सवानिमित्त चार दिवसांपूर्वीच महानगरपालिकेकडून नार्वेकर गल्ली परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रविवारी दिवसभर विधिवत पूजा-अर्चा पार पडल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.