महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुंकळ्ळीतील विठ्ठल मंदिरात 21 पासून कार्तिक उत्सव

12:19 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुंकळ्ळी : ताकाबांद, कुंकळ्ळी येथील श्री विठ्ठल मंदिरात वार्षिक कार्तिक उत्सव विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार असून पहिल्या दिवशी मंगळवार 21 रोजी पुन:प्रतिष्ठापना दिवस, सकाळी 9 वा. श्रींस महाभिषेक, विष्णू गायत्री अनुष्ठान, पूर्णाहुती, नंतर आरती व महाप्रसाद, संध्याकाळी 7 वा. श्री विठ्ठल भजन मंडळी, ताकाबांद यांचा भजन कार्यक्रम, नंतर आरत्या व प्रसाद होईल. बुधवार 22 रोजी सकाळी 8 वा. श्रींस अभिषेक, सायंकाळी 4 वा. अभंगगायन स्पर्धा (एकेरी), त्यानंतर आरत्या आणि प्रसाद, तर गुऊवार 23 रोजी सकाळी 9 वा. श्रींस अभिषेक, दुपारी आरत्या, प्रसाद व संध्याकाळी 5.30 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक, नंतर आरत्या व प्रसाद होईल. शुक्रवार 24 रोजी सकाळी 9 वा. श्रींस अभिषेक, संध्याकाळी तुळशी विवाह, दुपारी आणि रात्री आरत्या व प्रसाद होईल. शनिवार 25 रोजी सकाळी 9 वा. श्रींस अभिषेक, रात्री 10 वा. गौरी तनय कला संघ, धोणशी-नागेशी निर्मित आणि तुळशीदास धोणशीकर प्रस्तुत कोकणी नाटक ‘शेजारी आनी शेजारी’, नंतर आरत्या व प्रसाद होईल. रविवार 26 रोजी सकाळी 9 वा. श्रींस अभिषेक, दुपारी 3 वा. रांगोळी स्पर्धा, संध्याकाळी 5 वा. वेशभूषा स्पर्धा, 7 वा. एकपात्री स्पर्धा, त्यानंतर आरत्या आणि प्रसाद होईल. सोमवार, 27 रोजी सकाळी 9 वा. श्रींस अभिषेक, दुपारी आरत्या व प्रसाद व रात्री 8 वा. महाआरती, अन्नसंतर्पण आणि श्रींस अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी उत्सवाला उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article