‘रूह बाबा’च्या स्वरुपात परतणार कार्तिक
भूल भुलैया 3’च्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर निर्माते अनीस बज्मी यांनी या प्रसिद्ध हॉरर-कॉमेडी पटाचा चौथा भाग येणार असल्याची पुष्टी दिली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन या फ्रेंचाइजीशी जोडलेला राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘भूल भुलैया 4’ चित्रपटावर काम सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रेंचाइजीमुळे कार्तिक आर्यनच्या आकर्षक कॉमिक टायमिंगविषयी प्रेक्षकांना कळू शकले असल्याचे वक्तव्य अनीस यांनी केले आहे. माधुरी दीक्षित आणि विद्या बालन या दोन्ही अभिनेत्रींसोबत काम करताना अत्यंत मजा आली. फ्रेंचाइजीच्या चौथ्या भागात नवी अभिनेत्री दिसून येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. तसेच तो मागील वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी यांची जोडी प्रेक्षकांना पसंत पडली होती.