For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्तिक कुडणेकर यांचे निधन

06:25 AM Dec 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
कार्तिक कुडणेकर यांचे निधन
Advertisement

प्रतिनिधी/ म्हापसा

Advertisement

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते कार्तिक कुडणेकर (वय 46 वर्षे) यांचे बुधवारी 24 रोजी मध्यरात्रीनंतर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात निधन झाले. त्यांच्या निधनाने सुकूर परिसरात शोककळा पसरली आहे. सुकूर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र साईदीप यांनी मंत्राग्नी दिला. कार्तिक कुडणेकर यांच्या मागे पश्चात पत्नी कीर्ती कुडणेकर आणि दोन मुले साईदीप व यशदीप, तसेच आई, बहीण असा परिवार आहे.  त्यांना सर्पीण आजार झाला होता. ऐन निवडणुकीच्या दिवसात त्यांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने तो आजार बळावल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.साळगावचे आमदार केदार नाईक, जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, गुऊप्रसाद पावसकर, महानंद अस्नोडकर, बहुतेक जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच सदस्य, कार्तिक यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्तिक यांना श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून दु:ख व्यक्त

Advertisement

गोवा प्रदेशा भाजपाध्यक्ष दामू नाईक यांनी कार्तिक कुडणेकर यांच्या आकस्मिक निधनामुळे दु:ख व्यक्त केले आहे. आम्ही भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यास मुकलो आहोत. हे दु:ख झेलण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कार्तिकच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून कार्तिक भाजपचा एक सच्चा कार्यकर्ता होता. भाजपसाठी त्यांनी केलेले कार्य न विसरण्याजोगे आहे. ते दानशूर होते, असे लोबो यांनी म्हटले आहे.  आमदार केदार नाईक यांनी कार्तिक यांचे कार्य, त्यांची तळमळ प्रामाणिक होती. त्यांच्या निधनाने आम्ही एका चांगल्या मित्राला मुकलो आहोत असे म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. पर्वरी महामार्गावरील उ•ाणपुलाच्या बांधकामावेळी श्रीखाप्रेश्वर देवाची मूर्ती, मंदिर व वटवृक्ष हटवण्याच्या निर्णयाविरोधात कार्तिक कुडणेकर यांनी ग्रामस्थांसह जोरदार आंदोलन छेडले होते.

Advertisement
Tags :

.