For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा रामेश्वर संस्थानच्या कार्तिक उत्सवाची दीपोत्सवाने सांगता

04:08 PM Nov 06, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आचरा रामेश्वर संस्थानच्या कार्तिक उत्सवाची दीपोत्सवाने सांगता
Advertisement

आचरा | प्रतिनिधी

Advertisement

संस्थान आचरे गावच्या कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवाची सांगता बुधवारी रात्री  दीपोत्सवाने झाली. गेला महिनाभर सुरू असलेल्या रात्री होणा-या पालखी सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी रात्री शाही पालखी सोहळ्याने तर विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या काकडा आरतीची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी दहिहंडी फोडून करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी पालखी सोहळा चालू असताना दीपमाळा व आजूबाजूचा परिसर हजारो दिव्यांनी प्रकाशमान करत दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती.आचरे संस्थानात गेला महिनाभर चालणारा उत्सव म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला कोजागिरी पौर्णिमेपासून सुरूवात झाली होती. यात रोज रात्री पालखीची रामेश्वर मंदिरास सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटेला रामेश्वर मंदिराला लागूनच असलेल्या विठ्ठल मंदिरात काकडा आरती महिनाभर चालू होती.या उत्सवातील कार्तिक दशमीला आचरा वरचीवाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशी ला देऊळवाडी येथील विठ्ठल मंदिराला पालखीच्या भेटीचा सोहळा पारणे फेडणारा ठरला. त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी श्री देव रामेश्वर मंदिरात श्रीची मूर्ती पंचमुखी महादेव स्वरूपात सजले होते. वर्षातून काही ठराविकच वेळी दर्शनाचा लाभ होणा-या  या पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. रात्रौ मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळुन दिपोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक रांगोळ्या काढून दिप प्रज्वलीत करून साजविण्यात आले होते. या उत्सवाची पालखी प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळ्याची सांगता  झाली.‌ तर पहाटे विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या काकडा आरतीची सांगता दहीहंडी फोडून दहिकाल्याने  झाली. या सोहळ्याला भाविकांची गर्दी उसळली होती. इनामदार श्री देव रामेश्वर यांच्या वतीने प्रत्येक भविकास श्रीफळ व चुरमुरे प्रसाद म्हणून देण्यात आला.

Advertisement
Advertisement
Tags :

.