25 डिसेंबरला येणार कार्तिक-अनन्याची लव्हस्टोरी
‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ चित्रपट
चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’मधून अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन चालू वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. समीर विध्वंस यांच्या दिग्दर्शनातील आणि धर्मा प्रॉडक्शनच्या सहकार्याने निर्मित रोमँटिक चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. कार्तिकने स्वत:च्या इन्स्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अनन्या आणि कार्तिक दोघेही एकत्र अत्यंत आनंदी दिसून येत आहेत, याचबरोबर कॅप्शनमध्ये ‘मी पुन्हा येतोय, यावेळी 25 डिसेंबरला’ असे नमूद करण्यात आले आहे. कार्तिक आर्यन आणि अनन्या या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. यापूर्वी दोघांनी 2019 मध्ये ‘पती पत्नी और वो’ चित्रपटात एकत्र काम केले होते.
त्या चित्रपटात भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत होती. ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ चित्रपटात कार्तिक आणि अनन्यासोबत जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अगस्त्य नंदाचा चित्रपट ‘इक्कीस’सोबत स्पर्धा करावी लागणार आहे.