‘नागझिला’मध्ये कार्तिक आर्यन
कार्तिय आर्यन आता मोठ्या पडद्यावर नवी भूमिका साकारणार आहे. यावेळी अभिनेता एक इच्छाधारी नाग होत प्रेक्षकांना घाबरविणार आहे. या चित्रपटासाठी त्याने करण जौहरसोबत हातमिळवणी केली आहे. चित्रपटाचा पहिला लुक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटात कार्तिक पहिल्यांदाच इच्छाधारी नागाच्या भूमिकेत दिसून येईल. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आणि करण जौहरच्या प्रॉडक्शन हाउसने ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाकरता भागीदारी केली होती. तर नागझिलाचे दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा करत आहेत. याची निर्मिती करण जौहर, महावीर जैन, अदार पूनावाला, अपूर्व मेहता, सुजीत जैन आणि मृगदीप लांबा करत आहेत. हा चित्रपट काल्पनिक अन् लोककथेवर आधारित असणार आहे. कार्तिक सध्या अनुराग बसूच्या आगामी चित्रपटात काम करत असून यात त्याच्यासोबत श्रीलीला झळकणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असून याचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला.