For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्ती चिदंबरम पुन्हा अनुपस्थित

06:47 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
कार्ती चिदंबरम पुन्हा अनुपस्थित
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ती चिदंबरम हे ईडीच्या चौकशीसाठी पुन्हा अनुपस्थित राहिल्याने त्यांना नव्याने पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गंभीर आरोप आहे. 2011 मध्ये काही चीनी नागरिकांना भारताचा व्हिसा मिळवून देण्यात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. ईडीने जी कागदपत्रे आपल्याकडून मागितली आहेत, ती संकलित करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे, असे कारण त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीसाठी दिले आहे.

कार्ती चिदंबरम आणि त्यांचे सहकारी एस. भास्कररमण यांना वेदांता उद्योगसमूहाची एक कंपनी टीएसपीएल कडून चीनी नागरीकांच्या व्हिसासाठी 50 लाख रुपये लाचेपोटी देण्यात आले होते, असाही आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वकीलाच्या माध्यमातून ईडीला 100 पानी पत्र पाठविले असून त्यात अनुपस्थितीची कारणे दिल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.