कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तृप्ति डिमरीसोबत दिसणार कार्तिक

06:46 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अॅनिमल चित्रपटानंतर तृप्ति डिमरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिला आता नॅशनल क्रश आणि भाभी नंबर 2 या नावाने संबोधिले जाते.  तिचा विक्की विद्या का वो वाल वीडियो हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. तृप्तिने मागील काही काळात अनेक चित्रपट स्वीकारले असून यातील जवळपास चित्रपटांमध्ये ती नायिका म्हणून झळकणार आहे.

Advertisement

Advertisement

याचबरोबर तृप्ति ही अनुराग बासू यांच्या रोमँटिक ड्रामामध्ये काम करणार आहे. याचे चित्रिकरण अलिकडेच सुरू झाले आहे. कार्तिक आर्यन यात मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाला भूषण कुमार संगीत देणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत चालणार आहे.

अनुराग बासू यांचा हा चित्रपट असल्याने यात प्रेमकथेचा नवा पैलू दिसून येणार आहे. तर तृप्ति आणि कार्तिक ही जोडी भूल भुलैया 3 या चित्रपटातही दिसून येणार असल्याचे मानले जात आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article