For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्तिक, निर्माबेन नवी दिल्ली मॅरेथॉन विजेता

06:36 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार्तिक  निर्माबेन नवी दिल्ली मॅरेथॉन विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रविवारी येथे आयोजित केलेल्या अकराव्या नवी दिल्ली मॅरेथॉनचे जेतेपद मुंबईचा धावपटू कार्तिक करकेरा ,महिलांच्यात निर्माबेन ठाकुरने पटकाविले. ही मॅरेथॉन 42.2 कि. मी. पल्ल्याची आयोजित केली होती.

मुंबईच्या कार्तिक करकेराने नवी दिल्ली मॅरेथॉन 2 तास, 13 मिनिटे आणि 10 सेकंदाचा अवधी घेत जिंकली. तसेच त्याने जपानमध्ये चालू वर्षाअखेरीस होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादा पार केली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या 28 वर्षीय कार्तिक करकेरा आता आगामी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये गोपी थोंकलने 2 तास, 13 मिनिटे आणि 12 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर मानसिंगने 2 तास, 13 मिनिटे आणि 15 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले.

Advertisement

या मॅरेथॉनमध्ये इलाईट महिलांच्या विभागात निर्माबेन ठाकुरने 2 तास, 41 मिनिटे आणि 15 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद मिळविले. भागिरथीने 2 तास, 43 मिनिटे आणि 28 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर महाराष्ट्रच्या अश्विनी जाधवने 2 तास, 56 मिनिटे आणि 59 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये 31 देश आणि 490 शहरातील सुमारे 30 हजार धावपटू सहभागी झाले होते. नवी दिल्ली मॅरेथॉनला ऑलिम्पिक पदक विजेता विजेंद्र सिंग आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांनी ध्वज दाखवून उद्घाटन केले.

Advertisement
Tags :

.