For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकाचा रेल्वेवर निसटता विजय

06:11 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकाचा रेल्वेवर निसटता विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ सुरत

Advertisement

मनिष पांडेच्या नाबाद आणि चिवट अर्धशतकाच्या जोरावर येथे रविवारी झालेल्या 2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट क गटातील सामन्यात कर्नाटकाने रेल्वेचा केवळ एका गड्याने पराभव केला. या सामन्यात रेल्वेने कर्नाटकाला निर्णायक विजयासाठी 226 धावांचे आव्हान दिले होते. कर्नाटकाने दुसऱ्या डावात 82.4 षटकात 9 बाद 229 धावा जमवित हा सामना थोडक्यात जिंकला. मनिष पांडेने नाबाद 67, विजयकुमारने 38, समर्थने 35, अनिषने 35 धावा जमविल्या. रेल्वेच्या आकाश पांडेने 94 धावात 5 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - रेल्वे प. डाव 155, कर्नाटक प. डाव 174, रेल्वे दु. डाव सर्व बाद 244, कर्नाटक दु. डाव 82.4 षटकात 9 बाद 229 (मनिष पांडे नाबाद 67, विजयकुमार 38, समर्थ 35, अनिष 35, आकाश पांडे 5-94).

Advertisement

Advertisement
Tags :

.