महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्नाटकाचा दुसरा विजय

06:34 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / अहमदाबाद

Advertisement

2024 च्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील क गटातील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्नाटकाने पुडुचेरीचा 3 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात कर्नाटकाच्या आर. समरनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून पुडुचेरीला प्रथम फलंदाजी दिली. पुडुचेरीने 50 षटकात 9 बाद 211 धावा जमविल्या. कर्णधार अरुण कार्तिकने 2 षटकार आणि 3 चौकारांसह 71, तर अमन खानने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 45 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे विद्याधर पाटीलने 27 धावांत 4 तर श्रेयस गोपालने 44 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर कर्नाटकाने 40.5 षटकात 7 बाद 214 धावा जमवित हा सामना जिंकला. आर. समरनने 87 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 100 धावा झळकविल्या. श्रेयस गोपालने 3 चौकारांसह 40 धावा केल्या. पुडुचेरीतर्फे विजाई राजाने 40 धावांत 3 तर अमन खानने 49 धावांत 2 गडी बाद केले. या स्पर्धेतील कर्नाटकाचा हा दुसरा विजय असून पहिल्या सामन्यात त्यांनी बलाढ्या मुंबईला पराभूत केले होते.

संक्षिप्त धावफलक पुडुचेरी 50 षटकात 9 बाद 211 (अरुण कार्तिक 71, अमन खान 45, अवांतर 31, विद्याधर पाटील 4-27, श्रेयस गोपाल 2-44), कर्नाटक 40.5 षटकात 7 बाद 214 (आर. समरन नाबाद 100, श्रेयस गोपाल 40, अवांतर 19, विजाई राजा 3-40, अमन खान 2-49)

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article