For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकाचा प्रताप कालकुंद्रीकर हर्क्युलस किताबाचा मानकरी

10:08 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकाचा प्रताप कालकुंद्रीकर हर्क्युलस किताबाचा मानकरी
Advertisement

गुरुनाथ गारर्गे पहिले उपविजेते,  विशाल गावडे दुसरे उपविजेते

Advertisement

बेळगाव : मराठा युवक संघ, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने   निमंत्रितांच्या आंतरराज्य स्पर्धेत बेळगाव हर्क्युलस शरीरसौष्ठव स्पर्धेत कर्नाटकाच्या प्रताप कालकुंद्रीकरने बेळगाव हर्क्युलस शरीरसौष्ठव हा मानाचा किताब फटकाविला. महाराष्ट्राच्या गुरुनाथ गारगेने पहिले उपविजेतेपद, विशाल गावडेने दुसरे उपविजेपद पटकाविले. मराठा मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या ही स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार घेण्यात आली.

बेळगाव हर्क्युलस निकाल पुढीलप्रमाणे :

Advertisement

बेळगाव हर्क्युलस तीन राज्यांच्या निमंत्रितांच्या स्पर्धेत 60 किलो गट-1) अवधूत निगडे (महाराष्ट्र), 2) गंगाधर स्वामी (कर्नाटक), 3) अहमदखान पठाण (गोवा), 4) राहुल प्रसाद (गोवा), 5) गजानन गावडे (कर्नाटक), 70 किलो गट-1) प्रताप कालकुंद्रीकर (कर्नाटक), 2) राजू तेली (गोवा), 3) गणेश पाटील (कर्नाटक), 4) सुनील भातकांडे (कर्नाटक), 5) झाकीर हुल्लुर (कर्नाटक), 80 किलो गट-1) विशाल गावडे (महाराष्ट्र), 2) महेश गवळी (कर्नाटक), 3) प्रसाद बाचीकर (कर्नाटक), 4) रंजीत चौगुले (महाराष्ट्र), 5) रवी गाडीव•र (कर्नाटक), 80 किलो वरील गट- 1) गुरुनाथ गारगे (महाराष्ट्र), 2) समर्थ दालगी (महाराष्ट्र), 3) अमर गुरव (कर्नाटक), 4) काशिनाथ नायकर (कर्नाटक), यांनी विजेतेपद पटकाविले. बेळगाव हर्क्युलस किताबासाठी प्रताप कालकुंद्रीकर, गुरुनाथ गारगे, वेशाल गावडे, अवधूत निगडे यांच्यात लढत झाली .गुरुनाथ गारगे, विशाल गावडे, प्रताप कालकुंद्रीकर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये कर्नाटकाच्या प्रताप कालकुंद्रीकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर बेळगाव हर्क्युलस हा मानाचा किताब पटकावीला. महाराष्ट्राच्या गुरुनाथ गारगेने पहिले उपविजेतेपद, तर विशाल गावडे महाराष्ट्र याने दुसरे उपविजेतेपद पदकाविले, स्पर्धेनंतर बाळासाहेब काकतकर, संजय मोरे, दिगंबर पवार, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, मारूती देवगेकर, दिनकर घोरपडे, शिवाजी हंगिरगेकर, रमेश पावले, सुनील भोसले, नारायण किटवाडकर, अजित सिद्दण्णवर, जे.डी. भट आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी अजित सिद्धण्णवर, गंगाधर एम, बसवराज आरळीमट्टी, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, सुनील पवार, सुनील राऊत, जी.डी भट्ट, उमा महेश, जे. नीलकंठ, नूर मुल्ला, गजानन हंगीरगेकर, सुनील अष्टेकर, आकाश हुलियर यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.