For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कर्नाटक संघाची पकड अधिक मजबूत

06:04 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक संघाची पकड अधिक मजबूत
Advertisement

वृत्तसंस्था, गुवाहाटी

Advertisement

रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे इलाईट ब गटातील सुरू असलेल्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर कर्नाटकाने पहिल्या डावात 5 बाद 496 धावांचा डोंगर उभा करत आसामवर 361 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कर्नाटकाने सामन्यावरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. क

या सामन्यात आसामचा पहिला डाव केवळ 135 धावांत आटोपला. कर्नाटकाच्या रितेश भटकळ आणि शिखर शेट्टी यांनी प्रत्येकी 5 बळी मिळविले. त्यानंतर कर्नाटकाने 2 बाद 180 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी दिवसभरात आणखी 3 गडी गमविताना 316 धावांची भर घातली. सलामीच्या रोहन पाटीलने 1 षटकार आणि 13 चौकारांसह 89 तर मयांक अगरवालने 10 चौकारांसह 72 धावांचे योगदान दिले. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 129 धावांची भागिदारी केली होती.

Advertisement

मंगळवारी खेळाला पुढे सुरुवात झाल्यानंतर मयांक अगरवाल मोहित ठाकुरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर करूण नायर आलमच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. गौतमने 125 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 83 धावा झळकविताना अनिशसमवेत पाचव्या गड्यासाठी 148 धावांची भागिदारी केली. गौतम बाद झाल्यानंतर मनवंत कुमारने अनिशला चांगलीच साथ दिली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 95 धावांची भागिदारी केली. मनवंत कुमार 2 षटकार आणि 5 चौकारांसह 53 तर अनिश 2 षटकार आणि 10 चौकारांसह 142 धावांवर खेळत आहे. आसामतर्फे ए. दास आणि आलम यांनी प्रत्येकी 2 तर ठाकुरने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: आसाम प. डाव सर्वबाद 135, कर्नाटक प. डाव 5 बाद 496 (अनिश खेळत आहे 142, मनवंत कुमार खेळत आहे 53, रोहन पाटील 89, अगरवाल 72, करुण नायर 21, गौतम 83, अवांतर 17, ए. दास व आलम प्रत्येकी 2 बळी)

Advertisement
Tags :

.