For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मि. इंडिया ज्युनिअर, मास्टर्स स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड

10:55 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मि  इंडिया ज्युनिअर  मास्टर्स स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड
Advertisement

बेळगाव : मराठा युवक संघ व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित केलेल्या स्पर्धेदरम्यान करीमनगर तेलंगणा येथे होणाऱ्या 16 व्या मि. इंडिया ज्युनिअर व मास्टर्स स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड करण्यात आली. मराठा मंदिर मंगलकार्यालय येथे आयोजित स्पर्धेवेळी या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आली.

Advertisement

ज्युनिअर विभागात 55 किलो गट- शुभम चौगुले,  60 किलो गट-श्रेयश मोदगेकर,  65 किलो गट- समर्थ पाटील, श्रीधर हंडे, 70 किलो गट-ओम विजय पाटील, विनीत हणमशेट, 75 किलोवरील गट-शिवनाप्पा नरगुंद, भीमा बी., मास्टर्स विभागात 40 ते 50 वयोगट-प्रताप कालकुंद्रीकर 69.2, के. कुमार 76.6, श्रीनिवास कारवी 63.7, नित्यानंद कोटीयान 82, 50 ते 60 वयोगट - गजानन पाटील 74, शिबालाल छापरबंद 71.7. 60 वर्षावरील गट - सदानंद बडवाण्णाचे, राजकुमार बोकडे तर दिव्यांग गटात मोहम्मद हुसेन जमादार यांची निवड करण्यात आली आहे. या संघाचे व्यवस्थापक म्हणून रमेश कळ्ळीमनी तर प्रशिक्षक म्हणून काटेश गोकावी यांची निवड करण्यात आली आहे.

या निवड चाचणीप्रसंगी कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ शरीरसौष्ठव पंच जे. निलकंठ, जे. डी. भट, आशियाई पंच अजित सिद्दण्णावर, गंगाधर एम., राजाराम मजुकर, प्रकाश पुजारी, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, आकाश हुलीयार, सुनील आपटेकर, सुनील पवार, नूर मुल्ला, काटेश गोकावी, बसवराज अरळीमठी, प्रशांत सुगंधी, कृष्णा चिक्कतुंबल, सुनील राऊत, गजानन हंगिरगेकर यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.