महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळसा-भांडुराच्या संयुक्त पाहणीस कर्नाटकचा नकार

12:21 PM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : म्हादई नदीवर कळसा-भांडुरा येथे प्रकल्प बांधण्याचे नियोजन केलेल्या कर्नाटक सरकारने तेथे संयुक्त पहाणी करण्याची गोवा सरकारची विनंती फेटाळली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण दिले आहे. सदर प्रकल्पाची संयुक्त पहाणी करावी अशी विनंती गोवा सरकारने ‘प्रवाह’ या प्राधिकरणाकडे केली होती. तशी विनवणी असल्याचे ‘प्रवाह’ ने कर्नाटकला कळवले तेव्हा ती मान्य करण्यास कर्नाटक सरकारने नकार दिला आहे. तसे पत्र कर्नाटकतर्फे ‘प्रवाह’ प्राधिकरणास पाठवण्यात आले आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव राकेश सिंग यानी हे पत्र पाठवल्याचे सांगण्यात आले. म्हादई पाणी वाटपाचा वाद सोडवण्यासाठी ‘प्रवाह’ प्राधिकरणाची स्थापना केंद्राने केली असून त्याचे कार्यालय गोव्यात आहे. स्थापनेनंतर अनेक महिने उलटले असून ‘प्रवाह’ ची एकही बैठक झालेली नाही. ती व्हावी म्हणून गोवा सरकारने प्रयत्न चालवले असून तेथे संयुक्त पहाणीचा विषय आणण्याचे राज्य सरकारचे प्रयोजन आहे. हा विषय न्याप्रविष्ट असून प्राधिकरण त्यावर चर्चा कऊ शकत नाही अशी बाजू कर्नाटकने पत्रातून मांडली आहे. त्याला अजून गोवा सरकारने उत्तर दिलेले नाही. म्हादई जलतंटालवादाने दिलेल्या पाणी वाटप निवाड्याची कार्यवाही करावी म्हणून ‘प्रवाह’ ची स्थापना झाली असली तरी पाणी वाटपाचा विषय प्रलंबित आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article