महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कर्नाटक निर्णायक विजयाच्या मार्गावर

06:08 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे इलाईट क गटातील सुरू असलेल्या सामन्यात कर्नाटकाचा संघ निर्णायक विजयाच्या मार्गावर आहे. तामिळनाडूला निर्णायक विजयासाठी 355 धावांची गरज असून त्यांनी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 36 धावा जमविल्या.

Advertisement

या सामन्यात कर्नाटकाचा पहिला डाव 366 धावांवर आटोपला. देवदत्त पडीकलने 151 धावांची खेळी तर रवीकुमार समर्थ आणि हार्दिक राज यांनी अर्धशतके झळकविली. तामिळनाडूतर्फे अजित रामने 4 तर साईकिशोरने 3 गडी बाद केले. कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर तामिळनाडूचा पहिला डाव 151 धावात आटोपला. नारायण जगदीशनने 40 तर बाबा इंद्रजितने 48 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे विशाखने 4, शशिकुमारने 3 तर हार्दिक राजने 2 गडी बाद केले. कर्नाटकाने उपलब्ध असूनही तामिळनाडूला फॉलोऑन दिला नाही. कर्नाटकाचा दुसरा डाव 56.4 षटकात 139 धावात आटोपला. तामिळनाडूच्या अजित रामने 61 धावात 5 तर साईकिशोरने 2 गडी बाद केले. तामिळनाडूला निर्णायक विजयासाठी 355 धावांचे उद्दिष्ट मिळाले. त्यांनी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 36 धावा जमविल्या. सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी तामिळनाडूला 319 धावांची गरज असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत.

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक प. डाव 366, तामिळनाडू प. डाव 151, कर्नाटक दु. डाव 139, तामिळनाडू दु. डाव 1 बाद 36.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article