For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश विजयी

06:04 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक  झारखंड  मध्यप्रदेश विजयी
Advertisement

वृत्तसंस्था, कोईमतुर

Advertisement

हॉकी इंडियाच्या 16 व्या कनिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील सातव्या दिवशी झालेल्या विविध सामन्यांत कर्नाटक, झारखंड आणि मध्यप्रदेश या संघांनी प्रतिस्पर्ध्यावर शानदार विजय नोंदवित पूर्णगुण वसुल केले.

सोमवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कर्नाटकाने बंगालचा 4-3 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील 11 व्या मिनिटाला सुरजकुमार सहाने बंगालचे खाते उघडले. 29 व्या मिनिटाला प्रदीप मंडलने बंगालचा दुसरा गोल केला. नितेश शर्माने 38 व्या मिनिटाला बंगालचा तिसरा गोल करून कर्नाटकावर चांगलेच दडपण आणले होते. 51 व्या मिनिटाला प्रदीप मंडलने कर्नाटकाचा पहिला गोल, अचय्या एम. एम.ने कर्नाटकाचा दुसरा गोल, रेसीन एन्डने 58 व्या आणि अबेद लुगुनने 60 व्या मिनिटाला कर्नाटकाचा आणि निर्णायक गोल केला. या सामन्यात कर्नाटकाला तीन गुण मिळाले.

Advertisement

अ गटातील खेळविण्यात आलेल्या अन्य एका सामन्यात झारखंडने दिल्लीचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. चौथ्या मिनिटाला झारखंडचे खाते सबीयान किरोने उघडले. 40 व्या मिनिटाला प्रभज्योत सिंगने दिल्लीचे खाते उघडून बरोबरी केली. सबीयान किरोने 47 व्या मिनिटाला संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. सुजित करकेटाने 48 व्या मिनिटाला तर घुरण लोहराने 58 व्या मिनिटाला झारखंडचे गोल केले. दिल्लीतर्फे निशांतने 52 आणि 60 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले.

तिसऱ्या सामन्यात मणीपूरने दादरा-नगर हावेली दिवदमणला 4-4 असे गोल बरोबरीत रोखले. सोमवारी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात मध्यप्रदेशने तामिळनाडूचे आव्हान 4-0 असे संपुष्टात आणले. तसेच ओदीशाने मणिपूरचा 4-1 असा पराभव केला. हरियाणा आणि मध्यप्रदेश यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.

Advertisement
Tags :

.