For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक, दिल्ली, हरियाणा यांची विजयी सलामी

06:48 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक  दिल्ली  हरियाणा यांची विजयी सलामी
Advertisement

वृत्तसंस्था / हैदराबाद (तेलंगणा)

Advertisement

येथील बालयोगी स्टेडियमवर सुरू झालेल्या 72 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय कब•ाr स्पर्धेत पहिल्या दिवशी कर्नाटक, दिल्ली, हरियाणा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली. सदर स्पर्धा 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण 8 सामने खेळविले गेले. या स्पर्धेत सहभागी झालेले संघ 8 गटात विभागण्यात आले आहेत. कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, हिमाचलप्रदेश, चंदीगड, राजस्थान, तामिळनाडू आणि छत्तीसगड यांनी विजय नोंदविले.

Advertisement

अ गटातील सामन्यात दिल्लीने जम्मू काश्मीरचा 61-14 तर ब गटातील सामन्यात हिमाचल प्रदेशने आसामचा 49-24 अशा गुणांनी पराभव केला. क गटातील सामन्यात राजस्थानने यजमान तेलंगणाचे आव्हान 14-21 असे संपुष्टात आणले. ड गटातील लढतीत हरियाणाने झारखंडवर 62-16 असा विजय मिळविला. फ गटातील लढतीत तामिळनाडूने उत्तराखंडचा 57-26 तर गटातील लढतीत चंदीगडने पश्चिम बंगालचा 72-19, इ गटातील सामन्यात छत्तीसगडने केरळचा 43-36 असा पराभव केला. च गटातील सामन्यात कर्नाटकाने मणिपूरचे आव्हान 100-8 अशा गुणांनी एकतर्फी संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :

.