For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑर्चर्ड रिसॉर्टला ‘कर्नाटक बिझनेस एक्सलन्स’ अवॉर्ड

11:09 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑर्चर्ड रिसॉर्टला ‘कर्नाटक बिझनेस एक्सलन्स’ अवॉर्ड
Advertisement

गुणवत्ता-सेवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी : बेंगळूर येथे समारंभात प्रतिष्ठेचा पुरस्कार वितरण : सरव्यवस्थापकांकडून स्वीकार

Advertisement

बेळगाव : कर्मा हॉस्पिटॅलिटीच्या बेळगाव-नावगे येथील ‘ऑर्चर्ड बेस्ट इको-फ्रेंडली रिसॉर्ट अॅण्ड रेस्टॉरंट’ला गुणवत्ता व सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘कर्नाटक बिझनेस एक्सलन्स अॅण्ड अचिव्हर्स अवॉर्ड-2024’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे. बेंगळूर येथे विजयनगरमधील केएएसएसआयए सभागृहात झालेल्या एका भव्य समारंभामध्ये ऑर्चर्ड रिसॉर्टला हा पुरस्कार देण्यात आला. ऑर्चर्डचे सरव्यवस्थापक निशांत डुडवानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्याची अर्थव्यवस्था, रोजगार, संस्कृती, आदरातिथ्य, सेवेतील गुणवत्ता, नवनवीन संकल्पना व त्यांची अंमलबजावणी या सर्वांचा विचार करून हा पुरस्कार देण्यात येतो. सरकार हॉटेल आणि रेस्टॉरेंट्स, टूर संचालक या सर्वांनी एकत्र यावे, नवीन संकल्पनांचे आदान-प्रदान करावे, स्वत:चा ब्रॅन्ड निर्माण करावा, या हेतूने पुरस्कार देण्यात येतो. ऑर्चर्ड रिसॉर्टने अल्पावधीतच ग्राहकांची पसंती मिळविली असून ग्राहकांना यापुढेही अशीच सेवा देण्याची ग्वाही निशांत डुडवानी यांनी यावेळी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.