कर्नाटक बस व ट्रॅक्टरचा अपघात; २१ प्रवासी जखमी
म्हैसाळ येथे कर्नाटक बस-ट्रॅक्टरचा अपघात
एसटी बस तीस फूट खड्ड्यात कोसळली
सांगली :
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे के मार्ट जवळ कर्नाटक बस व ट्रक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्यात पलटली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कर्नाटक महामंडळाची KA23F 1005 ही बस म्हैसाळ हून कर्नाटकच्या दिशेने जात होती.यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रक्टर (MH10DN9557) दोन ट्रेलर सह म्हैसाळच्या दिशेने येत होता. कर्नाटक बसने ट्रक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली. त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली.यावेळी बसमधून जवळपास ४० प्रवाशी प्रवास करीत होते. अपघातानंतर म्हैसाळ येथील तरूणांनी बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता.बस चालकाचा उजवा पाय मोडला असून शर्थीचे प्रयत्न करून बसचालकाला बाहेर काढण्यात आले. सर्व जखमीवर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले.
या अपघातात जखमी झालेले एकूण २० रुग्ण आपल्या रुग्णालयात दाखल झालेले आहेत. यामध्ये १० पुरुष, ९ महिला आणि एक ४ वर्षाचे लहान मुल यांचा समावेश आहे. या बाळाही थोड्याप्रमाणात जखमी आहे. यामध्ये एकही प्रवासी हा गंभीर जखमी नसून किरकोण जखमी आहेत. तरी त्यांना पुढच्या २४ तासांसाठी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.